80s toys - Atari. I still have

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!